केतकी माटेगावकर आता संगीतकाराच्या भूमिकेत
आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ठसा उमटवणार्या केतकी माटेगावकर आपल्या सुरेल आवाजाने गायन करतांना देखील आपण बघितली आहे. अर्थात केतकी आता अभिनय, गायन यानंतर संगीतकाराच्या भूमिकेत एका व्हिडिओ अल्बमद्वारे पदार्णण करतांना लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. केतकीचा हा व्हिडीओ अल्बम प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असून, या व्हिडीओमध्ये सुरेश वाडकर यांच्या सुरेल आवाजाला केतकी माटेगावकर संगीतबद्ध करणार आहे. हा व्हिडीओ अभंगांचा असेल.
