कन्हैयाच्या स्पर्शानंतर पुतळ्याचे शुद्धीकरण
पाटणा, दि. 02 - बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी दिनकर यांच्या पुतळा गंगाजलाने धुवून घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याचे शुद्धीकरण केल्याचे समोर आले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने गुरुवारी दिनकर यांच्या पुतळ्याला हार घालून पुष्पांजली वाहिली होती. त्याच्या निषेधार्थ अभाविप‘ व बजरंग दलाने शुक्रवारी (ता.1) पुतळा गंगाजलाने धुतला. तसेच कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केलेल्या सभेत कन्हैयाने भाषण केले होतो. ही सभा ज्या मैदानावर झाली तेथे हवन पूजा करून कार्यकर्त्यांनी गंगाजल शिंपडले.
बेगुसराईतील बिहाट हे कन्हैयाचे मूळ गाव आहे. जेएनयू‘तील राष्ट्रविरोधी घोषणेच्या घटनेनंतर कन्हैयावर राजद्रोहाचा खटला दाखल होऊन त्याला अटक झाली होती. जामिनावर त्याची सुटका झाल्यानंतर तो प्रथमच आपल्या घरी आला होता. त्यामुळे संपूर्ण गावात उत्सवी वातावरण होते. कन्हैया घरी आल्याने आईवडील, कुटुंबातील अन्य सदस्य, नातेवाईक, शेजारी, ग्रामस्थ आनंदात होते. कन्हैयाच्या जिवाला धोका असल्याने बिहाट गाव व त्याच्या घराच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असल्याचे जिल्हा पोलिस अधिकारी रणजित कुमार मिश्रा यांनी सांगितले.