Breaking News

भरमसाठ गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

अहमदनगर, दि. 11 - केंद्र शासनाने 1 मार्च 2017 पासून नुकतीच घरगुती गॅस संदर्भात भरमसाठ वाढ् केलेली आहे. सध्या अहमदनगर शहरात घरगुती गॅसची 704 रुपयात मिळणारी गॅस टाकी ही 788 रुपये झाली आहे. त्यामुळे घरगुती गॅसच्या दरात अचानकपणे 15 टक्क्यापेक्षा जास्त अशी मोठी दरवाढ् झालेली आहे.  दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडेच मोडले आहे व त्यामुळे जगणे असह्य झालेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. दरवाढ त्वरीत मागे घ्यावी यासाठी काँग्रेसने आज निदर्शने केली. यावेळी गौरव ढोणे, नलिनी गायकवाड, मंगल भुजबळ, नईम सरदार, रजनी आमोदकर, रजनी ताठे, राजू नागुल, मोबीन शेख, मनाज अत्रे आदिनी निवेदन सादर केले.