Breaking News

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आ.मधुसुदन केंद्रे यांची वक्र दृष्टी

जिल्हा बँकेला ठोकणार टाळे-आ.डॉ.केंद्र

परभणी/प्रतिनिधी, दि. 09 - मागील तीन वर्षापासुन सततच्या नापीकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल होऊन कुटुंबाच्या ऊदर निर्वाहाच्या विवंचनेत आत्महत्या करत असुन शासनाकडुन आलेली आर्थिक मदत वेळेवर वाटप करण्यात प्रशासनास अपयश येत आहे.मागील तीन वर्षाचा अनुभव लक्षात घेता या वर्षी
शेतकर्‍यांनी मोठ्याप्रमाणावर पिकविमा भरला आहे.पिकविम्याची रक्कम शासनाने जिल्हा मध्यवर्ती बँकेस शेतकर्‍यांना वेळेवर वाटप करण्यासाठी वर्ग केली असुन मध्यवर्ती बँकेच्या गलथान कारभारामुळे अद्यापही विम्याची रक्कम दिली नसुन या पैशावर मलिदा खान्यासाठी जाणीव पुर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील शेतकर्‍यांसह आगामी 11 जुलै रोजी बँकेला टाळे ठोकण्याचा ईशारा दिला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत या वर्षी मोठ्याप्रमाणावर शेतकर्‍यांनी पिकविमा जमा केला होता चालु हंगामात शेतकर्‍यांना हा विमा वाटप करण्यासाठी जवळपास 500 कोटी रूपये शासनाने वर्ग केले आहेत परंतु बँक प्रशासनाच्या गलथानपणामुळे विमा वाटपात प्रचंड गोंधळ सुरू असुन संथ गतीने विम्याचे वाटप सुरू आहे.शासनाकडुन आलेला 500 कोटी निधी मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकेत ठेवला असुन या पैशावर मीळणार्‍या व्याजासाठी जाणीवपुर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनी केला आहे.या वर्षी शेतकर्‍यांनी स्वतः हुन मोठ्याप्रमाणावर पिकविमा भरला असुन निर्सगाच्या लहरीपणाचा कसोशीने सामना करता यावा यासाठी पिकविमा  काढला आहे. एकट्या गंगाखेड तालुक्यात पिकविम्याचे 95 कोटी रूपये आले असुन 51 गावातील शेतकर्‍यांनी पिकविमा भरला आहे.गंगाखेड येथिल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत 95 कोटी रूपये आलेले असुन मागील एक महिण्यापासुन केवळ 7 गावातील शेतकर्‍यांनाच या विम्याचे वाटप झाले आहे.18जुन पासुन विम्याची रक्कम वाटप होत असुन ही वाटप अतिशय संथ गतिने होत असल्याची तक्रार तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी आ.मधुसुदन केंद्रे यांच्याकडे केली आहे. शेतकर्‍यांच्या या तक्रारीला गांर्भीयाने घेत आ.मधुसुदन केंद्रे यांनी मध्यवर्ती बँक प्रशासनाला निर्वाणीचा ईशारा देत आगामी 10 जुलै पर्यंत कारभार नाही सुधारला तर 11 जुलै रोजी बँकेला टाळे ठोकण्याचा ईशारा दिला आहे.जिल्ह्यातील शेतकर्‍यांची आडवणुक होवु नये या साठी जिल्ह्याच्या पालक मंत्र्यासह स्थानिक प्रशासनही गंभीर असल्याचे प्रसिध्दी माध्यमांतुन दाखवत असले तरी वस्तुस्थिती मात्र तशी दिसुन येत नाही.
गंगाखेड तालुक्या सारखीच जिल्ह्यातील ईतर तालुक्यांची अवस्था असुन हवालदिल झालेला शेतकरी बँकाच्या पायर्‍या झिझवत बँकेचे खेटे खात आहे.शेतकर्‍यांच्या पिकविम्यासाठी आजवर अनेक बैठका झाल्या विचार विनिमय झाले मंत्र्यासह अनेकांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबिया सोबत फोटो सेशन करून पेपरात प्रसिध्द केले व आपला कळवळा जनतेसमोर मांडला परंतु हा पुळका  केवळ  मतांचा राजकिय डाव असुन शेतकर्‍यासांठी मनाभावातुन तदतीसाठी कोणताही पुढारी समोर आला नाही.अशा या बदहालीच्या परिस्थितीत गंगाखेड मतदार संघाचे आ.मधुसुदन केंंद्रे धडाडीने समोर आले असुन 11 जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांना सोबत घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेस ठोको टाळे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी शेतकर्‍यांच्या बँके संदर्भातील अडचणी जाणुन घेत असुन लवकरच आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकर्‍यांच्या हितार्थ दिलेला आवाज जिल्हा बँकेच्या अडचणी वाढवण्याचे चिन्ह दिसुन येत आहेत. कारण गेल्या कित्येक दिवसापासुन बँकेचे चेअरमन कुंडलीकराव नागरे बँक प्रशासनाकडे फिरकले नसल्याने व्यवस्थापनात अस्थव्यस्तता निर्माण झाली आहे. परिणामी बँकेच्या गलथाना कामांचा शेतकर्‍यांचा अतोनात विनाकारण त्रास होत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.