Breaking News

परभणी विधानसभेतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर - आ. डॉ. पाटील

परभणी/प्रतिनिधी, दि. 09 - परभणी विधानसभेचे शिवसेना आ. डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभा निवडणुकी पुर्वी पासुनच परभणीतील लोकांच्या मनावर अदिराज्या गाजवण्यास सुरुवात केली होती. निवडणुकीत विजय प्राप्त केल्या नंतरही आ.डॉ. राहुल पाटील आपल्या कतृत्वाची चुनुक दाखवुन परभणी
विधानसभेतील लोकांच्या गळ्यात ताइत बनण्यास पात्र होत असल्याचे वास्तव त्यांच्या कार्यातुन दिसुन येत आहे. आ. डॉ. राहुल पाटील गेल्या तिन वर्षापासुन नियमीतपणे विधानसभा क्षेत्रातील लोकांच्या समस्यांचा सोडवण्यास प्राधान्य देत असुन त्यांचे सार्वत्रीक स्वरुपाचे कार्य परभणीच्या विकासात भर पाडीत असल्याचे समाधानकारक कृर्तत्व आत्तापर्यंतच्या काळात पहिल्यांदाच होत असल्याचे समाधान नागरीकांकडून व्यक्त होत आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रा बरोबरच जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची निर्विवाद पणे सोडवणुक करणारा लोकप्रतिनिधीं म्हणुन सद्यस्थितीला बघीतल्या जात आहे. शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्‍नाची जाणीव ठेवून आ.डॉ. पाटील यांनी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातुन जाणार्‍या तिनधारा नाल्यावर साखळी बंधार्‍याची निर्मीती केली. त्या निर्मीतीतुन प्रचंड प्रमाणात जलसाठ्याची उपलब्धता होत असल्याचे वास्तव चित्र पावसामुळे बघण्यास मिळत आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकणार्‍या वन्य प्राणी हरिण, काळवीट, ससे यांना पाण्यासाठी  वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यक्ता भासणार नाही. शैक्षणिक कार्यातही आ.पाटील यांचे समाधानकारक कार्य जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला वेगळे वळण प्राप्त करुन देत असुन सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणुक करण्यास आ. डॉ.पाटील सदैवत्पर असल्याचे  विद्यार्थ्यांकडूनच ऐकण्यास मिळत आहे. शिक्षण संस्थांच्या कर्तृत्वाची स्तुती करुन त्यांना पाठबळ देत असल्याने शिक्षण संस्थाचालक देखील आ.डॉ. पाटील यांच्या आदर्शाला डोळ्या समोर ठेवून कार्य करत असल्याचे दिसुन येत आहे. शासन स्तरावर जिल्ह्याच्या विकासासाठी धडपड करणार्‍या आ. डॉ. राहुल पाटील यांच्यामुळे जिल्ह्यातील उर्ववरीत प्रस्तावीत कामे पुर्ण होत असुन येत्या काळात जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातुन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत वेळोवेळी आ.डॉ.पाटील व्यक्त करत आहेत. सर्वसामान्य नागरीकांपासुन ते वृध्दांपर्यंत सर्वांच्या अडीअडचणींची सोडवणुक करण्यासाठी आपल्या   पध्दतीने आ.डॉ. पाटील प्रयत्न करत असुन नुकतेच त्यानी वृध्दांची बैठक घेवून शासनाकडून मिळणारे आर्थिक अनुदान वेळेत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन वृध्दांना दिले आहे. निराधार, संजय गांधी, श्रावणबाळ, विधवा अशा सर्वांसाठीच योजनास्तरावर  काम करणार असुन एकही लाभार्थी लाभापासुन वंचीत राहणार नाही. असे मत आ.डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील मंत्रीमंडळाच्या झालेल्या विस्तारात युवा आ.डॉ. पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु असतांनाच परभणी जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक, युवा सैनिक  व जनता उत्सुकता दर्शवीत होती. परंतुन शिवसेनेच्या वाट्याला दोनच राज्यमंत्रीपदे आल्यामुळे आ.डॉ. पाटील यांचे नाव लाल दिव्याच्या गाडीसाठी दिसले नाही. परंतु येत्या काळात आ.डॉ. पाटील यांच्याकडून होत असलेल्या कामांची पावती म्हणुन  त्यांना मोठ्या ऑफरची शक्यता नाकारता येत नाही. कारण मराठवाड्यातील कतृत्ववान नेत्यांना राज्य शासन व केंद्र शासना अशा दोन्ही शासनस्तरावर महत्व प्राप्त झाले असुन देशाच्या राजकारणात अनेक बडे नेते मराठवाड्यात तयार झालेले आहेत ही वास्तव स्थिती देखील आ. डॉ. पाटील यांनी समजुन घेतल्याची चर्चा  जिल्ह्यात सध्या सुरु आहे.