Breaking News

नवी मुंबईतील कांदळवन संरक्षणासाठी विभागीयआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीचे पुनर्गठन

मुंबई, दि. 03 - नवी मुंबईतील  कांदळवन संरक्षणासाठी  दि. 3 ऑक्टोबर 2016 रोजीच्या शासननिर्णयान्वये विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या संनियंत्रण समितीच्या  संरचनेत उच्च न्यायालयाने सूचित केल्याप्रमाणे बदल करण्यात आला आहे.  
कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून, आता मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे.
पुनर्गठित समितीमध्ये विभागीय आयुक्त कोकण विभाग हे अध्यक्षपदी असतील. त्याशिवाय, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई, अप्पर आयुक्त- नवी मुंबई महानगरपालिका, महाव्यवस्थापक-पर्यावरण व वने सिडको, विभागीय वन अधिकारी- मुंबई कांदळवन संधारण घटक, नवी मुंबई पर्यावरण संवर्धनसमिती यांचे प्रतिनिधी, विभागीय आयुक्त कोकण भवन यांनी नामनिर्देशित केलेल्या आणि पर्यावरण क्षेत्रात काम केलेल्या अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी हे सदस्य म्हणून काम करतील, तर मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) मुंबई हे सदस्य सचिव म्हणून काम करतील.
यासंबंधीचा शासन निर्णय वन विभागाने दि. 23 फेब्रुवारी 2017 रोजी निर्गमित केला असून त्याचा सांकेतांक 201702231301530719 असा आहे.