जिल्ह्यातील 25 पैकी 15 धरणे 50 ते 100 टक्के भरले
पुणे, दि. 19 - जिल्ह्यातील 25 पैकी 15 धरणांतील पाणीसाठा हा 50 ते 100 टक्क्यांपर्यंत भरला आहे. मात्र, चितेंची बाब म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे उजनी जलाशय अद्याप वजाबाकीतच आहे. पुर नियंत्रण कक्षाद्वारे कळविण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 25 धरणांच्या आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनंतर हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील केवळ एकच म्हणजे कळमोडी धरण शंभर टक्के भरले आहे. तर खडकवासला 92 टक्के, कासारसाई 85.06 टक्के, येडगाव व गुंजवणी ही दोन धरणे अनुक्रमे 76.62, 74.44 टक्के भरले आहे. वडीवळे 67.75 टक्के, आंद्रा 68.24, मुळशी 61.15 व वीर धरण 69.23 टक्के इतके भरले आहे. 50 ते 60 टक्के भरलेल्या धरणामध्ये वडज 52.79, चासकमान 57.22, पवना 50.23, पानशेत 55.44, नीरा देवधर 52.76 व भाटघर 53.09 टक्के भरले आहे. उजनी धरण वजा 34.79 टक्क्यांवर आहे. तर नाझरे धरणात 0 टक्के पाणीसाठा आहे.
