Breaking News

शिवसेनेचा महापौर असल्याने नगरमध्ये उद्योगाला चालना मिळेल

। माजी आमदार सूर्यकांत महाडिक 

अहमदनगर, दि. 03 - राज्यात शिवसेनेचा 50 वा वर्धापन दिन 19 तारखेला साजरा झाला आणि नगरचा शिवसेनेचा महापौर 21 तारखेला बिनविरोध झाला. ही बातमी जेव्हा मुंबईत समजली तेव्हा खरोखरच राज्यातील शिवसैनिकांना दिलेली ही एक अविस्मरणीय भेटच होय, असे प्रतिपादन अखिल भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष तथा माजी आ.सूर्यकांत महाडिक यांनी व्यक्त केले.
अ.भा.कामगार सेनेच्यावतीने महापौर सुरेखा कदम यांचा सत्कार करताना अध्यक्ष माजी आ.सूर्यकांत महाडिक. समवेत शहरप्रमुख संभाजी कदम,शहर बँकेचे संचालक शिवाजी कदम,संतोष गेनप्पा, भाकरे महाराज आदिंसह कामगार सेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सूर्यकांत महाडिक पुढे म्हणाले, शहराचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर मोठमोठे उद्योग येणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण शिवसेनेच्या माध्यमातून निश्‍चितच प्रयत्न करु. यासाठी उद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करुन नवनवीन उद्योग नगरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करु, नगर मनपाचा महापौर हा शिवसेनेचा असल्याने मनपाच्या माध्यमातूनही यासाठी मोठे सहकार्य होईल, असे सांगून  महापौर सुरेखा कदम व शहर प्रमुख कदम यांच्याशी नगर शहरातील औद्योगिक परिस्थितीविषयी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला