हेक्टरचा गोल अन् जर्मनी उपांत्य फेरीत
बोर्डेक्स, दि. 03 - पेनल्टी शूटआऊटमध्ये जोनास हेक्टरने केलेल्या निर्णायक गोलमुळे युरो करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीने इटलीचा 6-5 असा पराभव केला.
जर्मनी आणि इटली या दोन बलाढ्य संघांत रविवारी रात्री उपांत्यपूर्व फेरीची ही लढत झाली. जर्मनी आणि इटली यांच्यातील हा सामना ठराविक व जादा वेळेत 1-1 असा बरोबरीत होता. त्यामुळे सामन्याचा निकाल हा पेनल्टी शूटआऊटमध्ये लागणार हे निश्चित झाले. पूर्वार्धात दोन्ही संघाना गोल करण्यात अ
पयश आले होते. उत्तर्धात दोन्ही संघानी जोमाने खेळ केला. अखेर 65 व्या मिनिटाला हेक्टरच्या पासवर ओझीलने गोल करत जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण, जर्मनीला ही आघाडी टिकविता आली नाही. 78 व्या मिनिटाला इटलीच्या बोन्यूसीने पेनल्टी कीकवर बरोबरी करणारा गोल नोंदविला. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.
पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांनी एकूण 18 किक मारल्या. अखेर जर्मनीच्या हेक्टरने नोंदविलेला गोल निर्णायक ठरला आणि जर्मनीला 6-5 अशी लढत जिंकता आली. जर्मनीचे प्रशिक्षक ज्योकिव लो यांनी हेक्टरचे अभिनंदन केले आहे. त्याने अतिशय कठीण परिस्थितीत गोल नोंदविला, असे त्यांनी म्हटले आहे. जर्मनीचा उपांत्य फेरीत फ्रान्स आणि आईसलँड यांच्यातील विजेत्याशी सामना होणार आहे. यापूर्वी पोर्तुगाल व वेल्स संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. फुटबॉल विश्वातील मोठ्या स्पर्धांत जर्मनीचा संघ सलग सहाव्यांदा उपांत्य फेरीत पोहचला आहे. जर्मनीला प्रथमच विश्वकरंडक व युरो करंडक स्पर्धेत इटलीचा पराभव करण्यात यश आले आहे. जर्मनीने 2014 मध्ये झालेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती.