पोलीस प्रशासनाकडून इफ्तार कार्यक्रम संपन्न
परभणी प्रतिनिधी, दि. 01 - परभणी पोलीस प्रशासनाने मुस्लिम समाजाच्या पवित्र रमाजन महिन्याचे औचित्य साधुन दिनांक 27 जुन रोजी येथील पाडेला फंक्शन हॉलमध्ये इफ्तार कार्यक्रम आयोजीत केला होता. कार्यक्रमासाठी जिलाधिकारी राहुल रंजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलस कार्यक्रम आयोजक जिल्हा पोलीस अधिक्षीका नियती ठाकर यांनी सर्व मुस्लिम समाजबांधवानी रमाजानच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी महिवाल यांनीदेखील शुभेच्छा देवून इफ्तारचा आस्वाद घेतला यावेळी अप्पर पुलिस अधिक्षक विश्व पानसरे, शहर डीवायएसपी दत्तराम राठोड, ग्राम डिवाएएसपी सुधाकर रेड्डी, नानलपेठ के पी.आय. एम.ए. रउफ, मोंढा पुलिस के पीआय श्रीमनवार, अपराध शाखा के बीपी चोरमले, कोतवाली के पीाआय सुजाता शानमे , मेमन मर्चंट असो. के उपाध्यक्ष जान मो. जानू, एम.आय.एम. के जिलाध्यक्ष एड. जावीद खादर, सज्जुलालामित्रमंडल के फारुख बाबा, एम.आय. के शहर अध्यक्ष जाकेर खुरेशी, पत्रकार हमीद मलीक, मोहसीन खान, मंचक खंदारे, गौतम मुंढे, यांच्यासह मोठ्या संख्येने सर्व जातीधर्माचे नागरीक उपस्थित होते.