क्रीडा अधिकारी यांच्यामुळे क्रिडा क्षेत्राला चालना
अहमदनगर, दि. 03 - अहमदनगर जिल्हा क्रिडा अधिकारी अनिल चोरमले यांची बदली झाल्याने त्यांचा जिल्ह्यातील क्रीडा संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना छत्रपती पुरस्कार विजेते प्रा.रंगनाथ डागवाले म्हणाले की, अनिल चोरमले यांच्यामुळे जिल्ह्यामध्ये विविध स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, अॅथेलॅटिक्स स्पर्धा, राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा अशा विविध क्रीडा प्रकारामुळे क्रीडा क्षेत्राला चालना मिळाली.
जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांच्या निरोप समारंभाप्रसंगी अॅथेलेटिक्स व हॉकी असो. च्या वतीने त्यांचा सत्कार करताना छत्रपती पुरस्कार विजेते प्रा.रंगनाथ डागवाले. समवेत प्रा.सुनिल जाधव, प्रा.असिफ बाबुलाल, भाऊराव वीर आदी उपस्थित होते. याप्रसंगी रामदास ढमाले, अंजली देवकर, दत्तापाटील नारळे, राजेंद्र कोतकर, प्राचार्य अशोक दोडके, अप्पासाहेब शिंदे आदिंसह प्रा.संजय साठे, घन:श्याम सानप आदि क्रिडा शिक्षक उपस्थित होते. सत्कारास उत्तर देतांना चोरमले म्हणाले की, सर्व क्रीडा संघटनांनी एकत्र येवून काम केल्यास कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. खेळाडू आणि त्याच्या प्रशिक्षकास मोठा सन्मान मिळतो. समाजानेही गुणवत्ता प्राप्त खेळाडू तसेच छत्रपती विजेत्या खेळाडूंचा सन्मान केला पाहिजे. मला ज्या संघटनांनी, क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले त्यांचा मी आभार आहे.