Breaking News

विम्बल्डन : सानिया-हिंगीस दुसर्‍या फेरीत

लंडन, दि. 04 : भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्सर्लंडची मार्टिना हिंगीसने जर्मन जोडी अ‍ॅना लेना फ्रिडसॅम आणि एल. सेजमंड जोडीला 6-2, 7-5 असे पराभूत करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. सानिया-हिंगीसने हा लढत एक तास 21 मिनिटांत जिंकली.
दुसरीकडे पुरुष दुहेरीत भारताचा रोहण बोपण्णा आणि त्याचा रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जियाने सहावी मानांकित जोडी स्लोवाकियाचा आंद्रेज मार्टिन आणि चिलीचा हेंस केस्टिलो या जोडीला 1 तास 18 मिनिटे चाललेल्या सामन्यात 7-5, 6-2 असे नमविले.