Breaking News

यू-मुंबाची बंगाल वॉरियर्सवर मात











हैद्राबाद, दि. 04 - प्रो कबड्डी लीग च्या तिसर्‍या चरणास रविवारी सुरूवात हैद्राबादमध्ये सुरूवात झाली. यू मुंबाने बंगाल वॉरियर्सला 8 गुणांच्या फरकोन पराभूत करीत स्पर्धेतील आपल्या तीसर्‍या विजयाची नोंद केली. नव्या खेळाडूंसह सर्वसमावेशकता प्राप्त झालेल्या यू मुंबा संघाने हैदराबाद मधील गच्चीबाऊली इन्डोअर स्टेडियमवर झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या लढतीत बंगाल वॉरियर्सला 26-18 असे नमवत तीसर्‍या चरणाची सुरूवात विजयाने केली. तर पहिल्या लढतीत 9 गुणांची आघाडी भरून काढीत पाटणा पायरेट्सने तेलगू टायटन्सवर 35-33 असा 2 गुणांनी  विजय मिळवला.
रिशांक देवाडिगाच्या भेदक चढाया व भक्कम बचावाच्या बळावर यू मुंबाने मध्यंतराला बंगाल वॉरियर्सवर पहिल्या लोण चढवत 16-9 अशी आघाडी घेतली.  मध्यंतरानंतर सूरजीत (3), राकेश कुमार (4) यांनी एकापेक्षा एक सरस पकडी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईच्या अनुप कुमारने बंगालच्या आघाडीपटूंना रोखले. बंगालचे चढाईपटू पूर्ण सामन्यात अपयशी ठरले. बंगालचे भरवशाचे नितीन मदने आणि मोनू गोयत यांनी 11 चढायांत एकंदर दोनच गुणांची कमाई केली.
तेलगू व पायरेट्स या सामन्यात सुरूवातीपासून तेलगूचे वर्चस्व होते तेलगू टायटन्सने पटणा पायरेट्स संघावर दोन लोण चढवला मात्र तरीही त्यांना पराभवाचा सामन्या करावा लागला. राजेश मोंडलने यशस्वी चढाई केली. जसमीर सिंग गुलियाच्या रुपात तेलुगू टायटन्सने 2-2 बरोबरी केली. टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने यशस्वी चढाई करताना एक गुण मिळवला. पाटण्याचा हुकमी एक्का प्रदीप नरवालची पकड करत टायटन्सने 4-5 अशी पिछाडी भरून काढली. सावध सुरुवातीनंतर पाटण्याने गती पकडली व 7-4 अशी आघाडी घेतली. टायटन्सच्या संदीप नरवालची पकड करताना पाटण्याच्या खेळाडूंना धसमुसळेपणा नडला आणि टायटन्सने 8-8 अशी बरोबरी केली. कर्णधार राहुल चौधरीच्या रुपात पाटण्याने 10-8 अशी आगेकूच केली. मग पाटण्याने 10-10 बरोबरी केली. प्रदीप नरवालची पकड करत टायटन्सने 11-10 अशी वाटचाल केली. घरच्या मैदानावर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात खेळताना टायटन्स संघाचा आत्मविश्‍वास उंचावला. आधारस्तंभ असलेल्या राहुल चौधरीने पाटण्याच्या खेळाडूंना चकवा देत संघाला 12-10 आघाडी मिळवून दिली. पुढच्या मिनिटाला राजेश मोंडलची पकड करत त्यांनी 16-11 वाटचाल केली. दमदार चढाया आणि अचूक पकडी करत टायटन्स संघाने मध्यंतराला 19-13 अशी स्थिती गाठली. विश्रांतीनंतर प्रदीप नरवाल (11), राजेश मोंडल (7) यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर पाटण्याने झपाटयाने पिछाडी भरून काढली. शेवटच्या तीन मिनिटांत झंझावाती खेळ करत पाटण्याने 35-33 अशी बाजी मारली.