Breaking News

विज कामगारांचे वर्कर्स फेडरेशन चे नेतृत्वात बेमुदत साखळी उपोषण सुरु

परभणी/प्रतिनिधी, दि. 08 -  आपल्या विविध मागण्यांसाठी विजय कामगारांचे वर्कर्स फेडरेशन ने दिनांक 07 जुलै 2016 रोजी प्रविभागीय कार्यालया समोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. 
अधिक्षक अभियंता महावितरण परभणी यांनी प्रविभाग अंतर्गत कार्यरत वेतनगट तीन व चार मधील विज कर्मचार्‍यांच्या मनोमानेल त्या पध्दतीने बदल्या करुन अन्याय केला आहे. सद
रच्या बदल्याचे आदेश काढतांना पक्षपाती व सुडभावनेचा दृष्टीाकेन ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय महावितरण मुख्य कार्यालय मुंबई यांचे परिपत्रक 514 व 540 अन्वये जाहिर करण्यात आलेल्या बदली विषयी सुचनांचा भंग करण्यात आला आहे. ज्यामुळे कर्मचार्‍यांत कमालीचा असंतोष पसरत असुन, वर्कस फेेडरेशनच्या  नेतृत्वात आज सुरु झालेल्या साखळी उपोषणात श्री किशोर गायकवाड, सुरेश लुटे, श्री किशन दुधारे, नखाते आदींचा समावेश आहे.