रस्त्याच्या कामात मनपा पदाधिकार्यांचा अडथळा;निधीअभावी दोनवर्षापासुन काम रखडले
परभणी/प्रतिनिधी, दि. 08 - शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील संजय गांधी नगर कॉर्नर ते अमरधाम स्मशानभुमीस जाणार्या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासुन निधीअभावी रखडले असल्याचे मत नगरसेवीका शांताबाई प्रभाकर लंगोटे यांनी व्यक्त केले आहे.
शहरातील सर्वनागरीकांच्या वापरात येणारा रस्त्याला मनपाच्या वतीने तुटपुंज्या निधीची तरतुद केली. त्यामुळे रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. शिवाय निधी देण्यास वारंवार टाळाटाळ करण्यात येते त्यामुळे आम्हाला काम करण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. सन 2014-2015 च्या दलितोत्तर विकास निधीतुन मान्यता देण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामावर 38 लाख 70 हजार 106 रु. निधी खर्च होणार आहे. सदरील रक्कम ही कमी असल्या कारणांने रस्त्याचे काम पुर्ण होणार नसुन या प्रभागाच्या नगरसेवीका शांताबाई प्रभाकरराव लंगोटे यांच्या निधीतुन काम पुर्ण करण्यासाठी 30 लाख रुपयाची मागणी केली आहे. परंतु अद्यापपर्यंत 17 लाख रुपये देण्यात आले असुन काम सुरु झाले आहे. परंतु अद्यापर्यंत काम होणे बाकी आहे. त्यामुळे मनपाने आणखी 30 लाख रुपयाचा निधी त्वरीत दिल्यास काम वेळेत पुर्ण होईल. सदरील काम हे शहरातील 30 प्रभागातील नागरीकांसाठी वापरायोग्य आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरीत पुर्ण करणे अनिवार्य आहे. परंतु मनपा प्रशासन जाणिवपूर्वक याकडे दुर्लक्ष करुन रस्त्याच्या कामात निधीअभावी अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप नगरसेवीका शांताबाई प्रभाकरराव लंगोटे यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षापासून डांबरीकरणासह मजबुत रस्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरीकांमध्ये रस्त्याच्या कामाची जोरदार चर्चा होत असुन नगरसेवक शांताबाई प्रभाकर लंगोटे काम पुर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नास मनपा प्रशासनातील पदाधिकारी चांगल्या प्रकारची साथ देत नसल्याने या कामास विलंब होत असल्याच्या भावनाही परिसरातील नागरीक व्यक्त करत आहेत. त्यामुळे कामास त्वरीत निधीची उपलब्धता करुन देण्यात यावी जेणेकरुन संबधीत रस्ता तुरंत वापरयोग्य होईल.