सिंधुदुर्गातील नद्यांनी पातळी ओलांडली!
सिंधुदुर्ग, दि. 07 - पावसाचा जोर कायम असल्याने सिंधुदुर्गातील बहुतांश नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली असून आचरा, किर्लोस, होडावडा, बांदा येथील नद्या धोकादायक रेषेवर वाहत आहेत. त्यात कुपवडे शिवापूर, आसोली, होडावडे-वेंगुर्ला या पुलांवर पाणी आल्याने ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. मालवण-देवगड भागात पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. तब्बल 12 तास जिल्ह्यातील 7 गावांतील वस्तीला गेलेल्या एसटीच्या गाडया अडकून पडल्या होत्या.
सिंधुदुर्गात गेल्या आठ दिवसांत पावसाची संततधार सुरू असल्याने नदी-नाले, धरणांच्या पाणीसाठयात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत पाच जणांचा बळी गेला आहे. सोमवारी कसाल नदीच्या पाण्याची पातळी वाढून पूरस्थिती निर्माण झाली होती. कुपवडे-शिवापूर पुलावर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली होती.
तर होडावडे-वेंगुर्ला मार्गावरील पुलावरही पाणी आले होते. सोमवारी मध्यरात्रीपासून वेंगुर्ले तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती बागायतीला तलावांचे स्वरूप आले आहे. समुद्रही खवळला असून; किनारपट्टीवर सुरक्षितता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.