भारताच्या विकासदर दाव्याबाबत अमेरिकेलाही शंका
वॉशिंग्टन, दि. 07 - मोदी सरकार भारताचा विकासदर 7.5 टक्क्यांवर पोहोचल्याचे सांगत आहे. मात्र, भारताचा हा दावा अतिशयोक्ती असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आर्थिक सुधारणांबाबत संथगतीने काम करत असल्याचे अमेरिकन सरकारच्या अहवालात नमूद केले.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने गुंतवणुकीबाब
वार्षिक अहवाल तयार केला. अमेरिकेच्या देशोदेशीच्या वकिलातींनी त्याबाबतची आकडेवारी पुरवली आहे. त्यावर हा अहवाल तयार केला. या अहवालात म्हटले की, मोदी सरकारने नोकरशाही कार्यक्षम केली असून थेट परकीय गुंतवणुकीसाठी अनेक विभाग खुले केले आहेत. ही बाब अभिनंदनीय आहे. मोदी सरकारने आर्थिक सुधारणा वेगाने राबवण्याच्या घोषणा केल्या, मात्र त्यावर अंमलबजावणी अत्यंत संथगतीने सुरू आहे.
भारताची अर्थव्यवस्था ही जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मात्र, सरकारचा भारताचा विकास दर 7.5 टक्के असल्याचा दावा अतिशयोक्ती असल्याचे त्यांनी अहवालात नमूद केले. मोदी सरकारने केलेल्या अनेक प्रस्तावित सुधारणा संसदेत मंजूर करून घेण्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार भाजपाप्रणीत सरकारला पाठिंबा देण्याच्या त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेपासून माघार घेत आहेत.