आता पॅनकार्ड केवळ तीन दिवसात
नवी दिल्ली, दि. 20 - पॅनकार्ड बनवण्यासाठी आता मोठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. केवळ तीन दिवसात तुम्हाला तुमचे पॅनकार्ड बनवून मिळणार आहे.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तसा निर्णय घेतला आहे. इज ऑफ डुइंग बिझनेस आणि जास्तीत जास्त लोकांना कराच्या जाळ्यात आणण्याच्या दृष्टीने सीबीडीटीने हे पाऊल उचलले आहे. कंपन्यांना तर एकाच दिवसात पॅनकार्ड मिळेल.
सीबीडीटीचे अध्यक्ष अतुलेश जिंदाल यानी सांगितले की, कंपन्यांना आता एक दिवसात टॅनकार्ड मिळवण्यात काहीच अडचण येणार नाही. डिजिटल सहीनेही ते आता टॅन क्रमांकासाठी अर्ज करू शकतील. सामान्य लोकांचे पॅनकार्ड आधार क्रमांकाच्या द्वारे झटपट तपासले जाईल आणि तीन ते चारच दिवसांत त्यांना पॅनकार्ड मिळणार आहे.