Breaking News

सरकारकडून बँकांना 22, 915 कोटींचा निधी

नवी दिल्ली, दि. 20 -  बुडीत कर्जामुळे अपयशी ठरलेल्या 13 सरकारी बँकांवर सरकार मेहेरबान झाले आहे. सरकार आता या बँकांना 22,915 कोटी रुपयांचा  निधी देणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला सर्वाधिक मदत मिळणार असून त्यांची रक्कम 7,575 कोटी रुपये आहे. बुडीत कर्जामुळे त्रस्त झालेल्या सरकारी  बँकांना हा दिलासा आहे.
अर्थ मंत्रालयाच्या अनुसार, त्यातील 75 टक्के निधी हा रकमेचा पुरवठा करण्यासाठी ताबडतोब दिला जाईल. उर्वरित 25 टक्के रक्कम बँकांची कामगिरी पाहून दिली  जाईल. कोणत्या बँकेला किती रक्कम हवी आहे, याचा निर्णय अनेक पैलूंवर विचार करून घेण्यात आला आहे. त्यासाठी सीएजीआर वाढीच्या पाच वर्षातील  कामगिरीचा आढावा घेण्यात आला. बँकांनी स्वत: घेतलेल्या आढाव्यांचा समावेश करण्यात आला. कोणत्या बँकेकडे किती वाढीची क्षमता आहे, याचाही विचार  करण्यात आला.