Breaking News

सोनपेठ नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

सोनपेठ प्रतिनिधी, दि. 03 -  येत्या नोव्हेंबंर-डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या पंचवार्षीक सार्वञीक निवडणुकीसाठी  सोनपेठ नगर परिषदेच्या 17 सदस्य संख्येच्या 8 प्रभागातील जागेसाठी शनिवारी शहरातील छञपती शिवाजीमहाराज न.प. सांस्कृतिक सभागृह येथे  नियंञक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या सभेमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले, यावेळी गौरव भारोटे या मुलाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढण्यात आल्या. 17सदस्य संख्येच्या सभागृहात 9 महिला असणार आहेत. शनिवारी जाहीर झालेल्या आरक्षणात ,अनुसुचित जाती  साठी 2 , नागरिकांचा मागस प्रवर्ग ( ओ.बि.सी.) 5, सर्वसाधारण महिला 5, सर्वसाधारण 5 असे एकुन 17 जागेसाठी आरक्षण निश्‍चित केले आहे. यावेळी प्रथम 8 प्रभागाचे नाव व प्रारूप रचना वाचुन दाखवण्यात आली. प्रभाग क्र. 1 ते 8 पैकी प्रभाग क्र. 5 हा 3 सदस्य संख्येचा असून उर्वरीत प्रभाग दोन सदस्यांचा असनार आहे. 8 प्रभागातील 17 जागेसाठी जाहीर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे,प्रभाग क्र .1  ( सोमेश्‍वर मंदीर )अ. अनुसुचितजाती महिला ,ब.सर्वसाधारण, प्रभाग क्र.2.( गणेशनगर )अ.अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब. सर्वसाधारण महिला.  प्रभाग क्र. 3(नगरेश्‍वर मंदीर) अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग महीला, ब.सर्वसाधारण. प्रभाग क्र.4.(संभाजी नगर) अ.नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ब.सर्वसाधारण.  प्रभाग क्र. 5.( सोनखेड मारोती मंदीर )अ. नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब.सर्वसाधारण.महिला, क.सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र .6.(प्रार्थमिक आरोग्य केंद्र,सोनपेठ परिसर )सर्वसाधारण महिला, ब. सर्वसाधारण. प्रभाग क्र. 7 ( महेबुब सुभानी दर्गा )अ. नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ब.सर्वसाधारण. प्रभाग क्र .8.( मार्केट यार्ड )अ.नागरीकांचा मागास प्रवर्ग, ब.सर्वसाधारण महिला.असे आरक्षण निश्‍चित झाले आहे.आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारपाडण्या साठी तहसिलदार जिवराज डापकर , मुख्याधिकारी जयवंत सोनवणे,लेखापाल सय्यद अन्वर ,डि.सी . मिसाळ यांनी सहभाग घेतला. आरक्षण सोडती मुळे इच्छुक उमेदवारांनी सुरक्षीत प्रभाग शोधा- शोध सुरू केली आहे. या बैठकीला विविध पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,आजी माजी नगरसेवक ,नागरीक उपस्थीत होते.