परभणी शहर लवकरच स्मार्ट सिटी-पालकमंत्री रावते
परभणी प्रतिनिधी, दि. 03 - परभणीच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम दुरदृष्टीने घेतले जात आहेत. परभणीला शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यावर विशेष लक्ष देण्यात येत असून कापुस ते कापडपर्यंत’ या संकल्पनेद्वारे वस्त्रोद्योगालाही चालना देण्यात येत आहे. शहरातील शिवाजी उद्यान हे एक आदर्श उद्यान उभारण्यात येणार असून यामध्ये ज्येष्ठ ना
गरिक, मुले व महिलांसाठी विशेष सुविधा उभारण्यात येतील. यासाठी निधीही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणासाठी वनक्षेत्र वाढविण्याची गरज असून यासाठी प्रत्येकांने झाडे लावून त्याची निगा राखण्याचा संकल्प करावा. तसेच येणा-या काळात शासनाकडून मोठ्या प्रमाणावर परभणी शहरासाठी निधी आणला जाईल आणि परभणी शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे काम आपण सर्वजण करू असे आवाहनही पालकमंत्री श्री रावते यांनी यावेळी केले. परभणी महानगरपालिकेच्या शिवाजी उद्यान (नाना-नानी पार्क) नुतनीकरण कामाचे भूमीपूजन परिवहन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, आमदार डॉ. राहुल पाटील, स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार, नगरसेवक डॉ. विवेक नावंदर, गंगाप्रसाद आणेराव, विरोधीपक्ष नेत्या अंबिका डहाळे, माजी आमदार मीराताई रेंगे, त्र्यंबकराव सुगावकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. आमदार डॉ.राहुल पाटील म्हणाले, जिल्हयात विविध क्षेत्रातील विकासकामे वेगाने मार्गी लावली जात आहेत. शहरातील शिवाजी उद्यान वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने उभारले जाईल. शहरात लवकरच अत्याधुनिक नाटयगृहही उभारण्यात येणार असल्याचे आमदार श्री.पाटील यांनी सांगितले. महापौर संगीता वडकर म्हणाल्या, शिवाजी उद्यानामुळे शहरातील नागरिकांना नक्कीच लाभ होणार आहे. हे एक निश्चितच आदर्श असे उद्यान उभे राहिल. महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार म्हणाले, शहराच्या परिपूर्णतेसाठी शहराच्या काही विशेष गरजा असतात. यामध्ये शहरातील हरितपट्टयांच्या, उद्यानांच्या विकासावर भर द्यावा लागेल. शिवाजी उद्यान निश्चितच आदर्श ठरेल. आगामी कालावधीत महानगरपालिकेतर्फे 28000 झाडे लावण्यात येणार आहेत. शहरात 150 हुन अधिक जागांवर जलपुनर्भरणाचा उपक्रम घेण्यात येत असून यासाठी नागरिकही पुढाकार घेत असल्याचे श्री रेखावार यांनी नमूद केले.