फोर व्हिलरमधून चोरी करण्यास येणार्या चौघांकडून 11 लाखांचा ऐवज जप्त
पुणे, दि. 07 - अलिशान मोटारीतून घरफोडी चोरी करण्यासाठी येणार्या राजस्थान व नेपाळमधील चौघा जणांंना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
गजराज मोतीलाल वर्मा (वय 31, रा. निर्मला स्कूलजवळ, चंदनगर, खराडी मुळ रा. कोड्री, ता. आष्टा, जि. सिहोर, राजस्थान), गोरे उर्फ गणेश रथी राणा (वय 26, रा. कुंती बंडाली, गाविश, ता. जि. मुघलसेन, नेपाळ), सुरेंद्र आस्थाराम चौधरी (वय 22, रा. काळूबाईनगर चाळ, खराडी बायपास, चंदननगर, मुळ रा. ग्राम सोती, ता. जि. पाली, राजस्थान) व नरपतसिंग पुनमसिंग रजपूत (वय 38, रा. काळूबाईनगर चाळ, खराडी बायपास, चंदननगर, मुळ रा. ग्राम भवरानी, ता. जि. पाली, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याजवळून पाच लहान मोठ्या लोखंडी कटावणी, एक्सा ब्लेड, दोन पाने, एक पक्कड, स्कू ड्रायव्हर व एक गुप्ती असे घरफोडीचे साहित्य व एक काळे रंगाचे डीव्हीआर मशिन, व्हिल्स कंपनीच्या सिगारेटचे दोन बॉक्स, ब्रिस्टॉल व फोर स्क्वेअर सिगारेट कंपनीचे एक-एक बॉक्स मिळून आला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आरोपी हे वॅगनार व होडा सीटीतून चोरी करण्यासाठी येत. आरोपींनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे 7, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वाहनचोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडून या 9 गुन्ह्यातील एक वॅगनार कार, एक होंडा सीटी कार, सोन्याची चैन, कर्णफुले, दोन अंगठ्या, चांदीची बांडी, तांब्याची भांडी, केंट प्युरीफायर, दोन इस्त्री, सिगारेटचे वेगवेगळ्या कंपनीचे बॉक्स असा एकूण 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव, वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे, सहायक निरीक्षक संदेश केंजळे, प्रमोद क्षिरसागर, हवालदार बाळासाहेब गायकवाड, अजय येवरीकर, मुन्ना शेख, अजय गायकवाड, संतोष जाधव, मल्हारी चव्हाण, विकास मडके, सारस साळवी, प्रविण पाटील, श्रीनाथ जाधव यांनी केली. त्यांना पिंपळे निलख कडून बालेवाडीकडे येणार्या आंबेडकर पुलाजवळ सापळा रचून अटक करण्यात आली.