पुणे पोलीस दलात 10 अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल
पुणे, दि. 14 - राज्य पोलीस दल अधिकाधिक सुसज्ज करण्याच्या उद्देशाने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 45 अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पोलीस आयुक्तालयांना देण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या 10 व्हॅन पुणे पोलीस दलात आज दाखल झाल्या आहेत. याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक प्रभात रंजन आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते आज (बुधवारी) सायंकाळी 5 वाजता गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात करण्यात आले.
राज्यातील एकूण 45 जिल्हे आणि आयुक्तालयाला या व्हॅन देण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या 10 व्हॅन गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयास आज बुधवारी सुपूर्त करण्यात आल्या. शास्त्रीय पद्धतीने भौतिक पुरावे गोळा करण्यासाठी तसेच गुन्ह्या संबंधी अधिकाधिक वैद्यानिक माहिती तपासण्या कामी यांचा उपयोग होणार आहे.
या प्रसंगी गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक रितेश कुमार, संजीवकुमार सिंघल, पोलीस अधिक्षक प्रसाद अक्कानवरू, पोलीस अधिक्षक राजेंद्र कुलकर्णी, उपसंचालक के. व्ही. कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पी. एल. अष्टपुत्रे व इतर अधिकारी उपस्थित होते.