Breaking News

नवनियुक्त महिला काँग्रेस पदाधिका-यांना नियुक्तीपत्र

बुलडाणा, दि. 07 - महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने टिळक भवन, मुंबई येथे नवनियुक्त पदाधिका-यांची बैठक 1 जुलै रोजी संपन्न झाली, त्यात नव-नियुक्त महिला पदाधिका-यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. 
अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण हे होते. तर मंचावर अ.भा.काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस तथा प्रभारी नेहा डिसुझा, प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड.चारुलता टोकस, सौ.कमलताई व्यवहारे, सचिव अंजली टापरे, सल्लागार समितीच्या व उपाध्यक्षा समितीत होत्या. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील प्रा.सौ.मिनलताई आंबेकर यांना उपाध्यक्ष म्हणून तर अ‍ॅड.सौ.जयश्रीताई शेळके, डॉ.तबस्सुम हुसेन यांना सरचिटणीस तर महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून सौ.वर्षाताई वनारे यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. चारुलताताई टोकस यांनी 6 महिन्यांच्या कार्यक्रम सर्व पदाधिका-यांना दिला व शुभेच्छा दिल्या. प्रभारी आ.नेहाजींनी महिलांना पक्षाची गरीमा कायम ठेवून राजकारण करण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात अशोकराव चव्हाण यांनी महिला काँग्रेसला मान सन्मान देण्यात येवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संघटनेतील महिलांचा जास्तीत जास्त सहभाग राहील असे विचार व्यक्त केले.