Breaking News

कास तलाव तुडुंब; सांडव्यातून वाहू लागले पाणी

सातारा, सांगली / दि. 7 (प्रतिनिधी) - गेले आठ दिवस कास तलाव परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला. कास तलावातील पाणी सांडव्यावरुन वाहू लागले आहे. त्यामुळे सातारा शहराच्या 1/3 भागाचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे.
सातारा शहराला वर्षभर पाणी पुरवठा करणारा कास तलाव पहिल्याच पावसात भरतो. असा अनुभव आहे. यंदाही पाऊस सुरु झाल्यानंतर कास तलाव कधी भरणार याची सातारकर आतुरतेने वाट पाहत होते. कास तलावातील पाणी पातळी चार दिवसात सहा फुटावरुन झपाट्याने वाढून 18 फूटांवर गेली. आणि त्यानंतर तलाव ओसंडून वाहू लागला.