Breaking News

बेलीफ कर्मचार्‍यांच्या गुणवंतांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)। 07 - डॉ. अब्दुल कलाम यांनी सांगितले होते की, प्रत्येकाने स्वप्न मोठी बघा आणि त्यासाठी ध्येय, चिकाटी आणि जिद्द ठेवल्यास आपण पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार होते. समाजाचे आपण काही तरी देणो लागतो, यासाठी देशाची व समाजाची सेवा करा, असे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले. 
जिल्हा न्यायालयातील बेलीफ संघटनेतर्फे कर्मचार्‍यांच्या गुणवंत पाल्यांचा व श्रीकांत सुसे यांची जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा न्यायाधीश एस. के. केवले, दिवाणी न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणोकर, मुख्य न्यायदंडाधिकारी जगताप, जिल्हा प्रबंधक सी. के. तरडे, आर. व्ही. शेख, संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत भिंगारदिवे, अविनाश नगरकर आदी उपस्थित होते.
न्यायाधीश केवले म्हणाल्या, चांगल्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. जीवनात मेहनतील महत्त्व द्यावे. यश हमखास मिळते. ताम्हणेकर यांनी कर्मचार्याचा पाल्य जिल्हाधिकारी व्हावा याचा अभिमान आहे. सध्याच्या पिढीने मोबाईल व संगणकाचा वापर हा योग्य करायला हवा, असे सांगितले. भिंगारदिवे यांनी प्रास्ताविक केले.