Breaking News

दिंडीतील सहभागाने आत्मशांती लाभते : संगमनाथ महाराज

अहमदनगर (प्रतिनिधी)। 07 - हमाल पंचायत, वीर हनुमान वारकरी सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे नगर ते पंढरपुर आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. विशाल गणेश मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. महादेव जाधव, संजय महापुरे, पांडुरंग जाधव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव, नगरसेविका सुवर्णा जाधव, विशाल देवस्थानचे
सचिव अशोक कानडे, विश्‍वस्त गजानन ससाणे, रामदास कानडे, झुंबर आव्हाड, मळूजी गाडळकर, बाळासाहेब राऊत, छबु गाडळकर आदी उपस्थित होते.
मनुष्य दिंडीत सहभागी झाल्यास त्यास आत्मशांती लाभते. त्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी वारी करावा, असे संगमनाथ महाराज यांनी सांगितले. दिंडीचे हे 13 वे वर्ष असून, या दिंडीमध्ये नगर शहर व आसपासचे भाविक मोठया संख्येने सहभागी होतात. महादेव मिसाळ, गोविंद सांगळे, बाळासाहेब राऊत, बाबासाहेब जाधव, संजय महापुरे, मच्छिंद्र आजबे, यशवंत औटी, भीमराज रासकर, मोहन रासकर, शंकर रासकर, गोकुळ औसरकर, गजानन ससाणे, मधुकर केकान आदी भाविक उपस्थित होते.प्रतिष्ठानचे गोविंद सांगळे, रामदास बजाबा कानडे, मच्छिंद्र आजबे, यशवंत औटी, छबुनाव गाडळकर आदी उपस्थित होते. या दिंडीत महिला, पुरुष मोठया संख्येने सहभागी असून, विठू नामाच्या गजरात उत्साहात प्रारंभ झाला.