Breaking News

परिवहन मंत्री रावते यांच्या आदेशाने खडी येथील बस सुरू

गंगाखेड प्रतिनिधी, दि. 03 -  पालम तालुक्यातील खडी येथील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली मानव विकास ही बस मध्यस्तरी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवासासाठी प्रचंड  हाल होत होते. ही बाब परिवहन मंत्री मा. दिवाकर रावते यांना सांगीतली असता त्यांनी ही बस तात्काळ सुरू केली.
खडी येथील ज्ञानेश्‍वर विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांना पालम मार्गे येण्या जाण्यासाठी मानव विकासची बस सुरू होती. पण काही कारणास्तव ही बस गंगाखेड आगाराने बंद केली होती. या बाबत ग्रामस्थ व शाळेचे मुख्याध्यापकांनी वारंवार आभार प्रमुखांना भेटुन बस सुरू करने बाबत अनेक वेळा विनंती केली होती. पण हि बस सुरू झाली नाही. अखेर परिवहन लेखी हे परभणी येथे आले असता या शाळेचे मुख्याध्यापक विशाल दाढेवाड यांनी प्रत्यक्ष भेटुन विद्यार्थ्यांसाठी सदरील बस गरजेची असल्या बाबत सांगण्यात आले. मा. रावतेजीनी तात्काळ विभाग नियत्रन परभणी यांना आदेश देउन पालम खडी चालणारी मानव विकासची बस सुरू करण्याचे आदेश दिले. या मुळे सदरील बस सुरू झाल्याने खडी ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थ शाळेची शिक्षक वृंद यांनी रावते यांच्या कार्यतत्वावर आभार व्यक्त केले.