Breaking News

इसिसच्या धोक्यामुळे हाय अर्लट जारी

नवी दिल्ली, दि. 03 - बांगलादेशमधील ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात दहशतवादी घुसून दहशतवादी कारवाया करु शकतात, याची शक्यता लक्षात घेऊन देशातील काही राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा बांगलादेशातील हल्ल्यानंतर सतर्क झालेल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशाच्या सीमा भागात असलेल्या पश्‍चिम बंगाल आणि आसाममध्ये आयएसचे दहशतवादी बांगलादेशमधून भारतातील या राज्यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली असून देशातील काही भागात हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.