Breaking News


लोणावळा : राज्यभर पावसाचा तडाखा चांगलाच वाढला असून, लोणावळा परिसरात सकाळी चोवीस तासांत 214 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर 48 तासांत 377 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण तुडुंब भरल्याने ओसंडून वाहू लागले आहे. रविवारी वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांना उत्साह अनावर झाला होता. तरुण, तरुणींसह अबालवृद्धांनी ओले चिंब होत भिजण्याचा आनंद लुटला.