कोल्हापूरजवळील अपघातात 5 जणांचा मृत्यू
कोल्हापूर, दि. 3 - इचलकरंजी येथून रक्षाविसर्जन करुण कोल्हापूरला येत असताना माले फाटा येथे रविवारी भीषण अपघात झाला असून, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यन कोंडीबा पांडू चौगले याच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अन्य मृतांची ओळख पटलेली नाही. या अपघातात 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर जवळील सादळे मादळे येथिल राहणारे एक कुटंबिय महिद्रा पिक अपने इचलकरंजीतून आपल्या घराकडे परतत असताना काळाने हा घात केला. पिक अप चक 09 उण 6388 असा क्रमांक आहे.
