सोशल मीडियावर वादग्रस्त माहिती पसरविणार्याची माहिती द्या : मुद्गल
सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. सोशल मीडियावर वादग्रस्त माहिती जर कोणी पसरवित असेल तर त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
रमजान ईद सणानिमित्त जिल्हा शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी मुद्गल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला पोलीस अधीक्षक संदीप पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यावेळी उपस्थित होते.
मुद्गल म्हणाले, सोशल मीडियावर येणारा प्रत्येक मजकुर हा वाचला पाहिजे तो वादग्रस्त नाही, याची खात्री करुनच तो पुढे पाठविला पाहिजे. युवा पिढी ही सोशल मीडियावर प्राप्त होणारा मजुकर खरा आहे की नाही याची शहानिशा न करता लगेच पुढे पाठवितात. याचा सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होतो. सोशल मीडियावर वादग्रस्त मजकुर टाकल्याचे अथवा पुढे परसरविल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा नोंद केला जातो. त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यावर परिणाम होतो याची युवा पिढीला जाणीव करुन देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी सण, उत्सव महत्वाचे असतात. जिल्ह्यात सर्व सण, उत्सव एकोप्याने साजरे केले जातात. जिल्ह्याची ही एक चांगली परंपरा आहे. येणार्या गणशोत्सवात पर्यावरणपुरक गणशोत्सव साजरा करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जाणार असल्याचे मुद्गल यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, शांतता समितीतील सदस्य हे शांती दूत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची फार मदत होते. जिल्ह्यात सर्व सण, उत्सव एकोप्याने साजरे केले जातात हे एक राज्याला व देशाला दिशा देणारे आहे. सोशल मीडियावर कोणी वादग्रस्त माहिती पाठवित असेल तर तात्काळ पोलिसांना कळविणे सामाजिक जबाबदारी आहे. गणशोत्सव साजरा करणार्यांसाठी आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे. त्याची माहिती गणशोत्सवानिमित्त होणार्या शांती किमिटीच्या सभेत दिली जाईल. वादग्रस्त फ्लेक्स कोठेही लागणार नाहीत याचीही दक्षता घेण्यात येणार आहे. पोलीस मित्र समिती प्रत्येक गावात स्थापन करण्यात येणार आहे.
सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले तर तहसीलदार राजेश चव्हाण यांनी आभार मानले. बैठकीस शांतता कमिटीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कोरेगाव, सातारा तालुक्यातील पोलीस पाटील, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.