Breaking News

ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत टच स्क्रीन सुविधा सातारा जिल्ह्यातील न्यायालयात सुरु


सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : न्यायालयीन कामकाजासाठी ई-कोर्ट प्रकल्पाची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे आवश्यक माहिती वकील तसेच पक्षकारांना तात्काळ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा न्यायालय सातारा आणि त्याअतंर्गत असलेली सर्व न्यायालयांच्या इमारतीत टच स्क्रीन मशीन्स बसविण्यात आली आहे. 
 प्रमुख जिल्हा न्यायाधीश बी. यु. देबडवार यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय व वकिल संघाच्या ग्रंथालयामध्ये या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डी. डब्ल्यु, देशपांडे, श्रीमती व्हि. एम. मोहिते आदी न्यायाधीश तसेच जिल्हा सरकारी वकील एम. एन कुलकर्णी व वकील संघाचे सचिव अ‍ॅडव्होकेट  चिकणे, जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक श्रीमती काटकर न्यायालय व्यवस्थ्यापक रविंद्र काळे, अधीक्षक श्रीमती साळवेकर व अजमल शेख आदी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीद्वारे दिल्या जाणार्‍या उपलब्ध निधीतून दिल्या जाणार्‍या उपलब्ध निधीतून पक्षकार व वकिलांना त्यांच्या प्रलंबित आणि निकाली अशा सर्व प्रकरणांची माहिती या यंत्रणेद्वारे सहजगत्या उपलब्ध होणार आहे. प्रत्येक न्यायालयाच्या दर्शनी भागात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेमध्ये टच स्क्रीनद्वारे इंग्रजी व मराठी भाषेतून प्रकरणाची सद्यस्थिती, तारीख तसेच वेळोवेळी होणारे आदेश व निकालपत्रे या सुविधेद्वारे पक्षकारांना पाहता येणार आहे.