Breaking News

जिंंतुरात पत्रकार संघाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

जिंतुर प्रतिनिधी, दि. 01 - मुस्लीम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्या निमीत्त मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इफ्तार पार्टी चे आयोजन दि. 29 जुन बुधवार रोजी करण्यात आले होते यावेळी माजी नगर अध्यक्ष सचिन गोरे, शहर अध्यक्ष  अ रहेमान भाई, रफीख सर, नगरसेवक अ‍ॅड गोलाप रोकडे, गणेश कुर्‍हे, अनिल धनसावंत, सलिम भाई, अब्दुल मखीत भाई प्रतिष्टीत व्यापारी सुनिल जी तोष्णीवाल, अ‍ॅड. मनोज सारडा, पो बि शिरसाठ, अहेमद बागवान, पत्रकार शेख शकील, इलमिर बेग, यांच्यासह जेष्ठ पत्रकार एम माजीद, मिहाल अहेमद यांच्यासह शहरातील राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थीती होती. इफतार पार्टीला यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शेख वाजीद, रामप्रसाद कठोळे, शकील शेख, इफतेखार शिवकुमार घुगे, शहेजाद पठाण मौ. सिराज नदवी, आदिंनी परिश्रम घेतले.