बोगस दारिद्य्र रेषेखालील याद्यांची चिखलीत होळी
मोदी सरकार हाय-हाय करत शेकडो महिला कार्यकर्त्यांची तहसिल कार्यालयावर धडक
बुलडाणा, दि. 01 - केद्र शासनाने नुकत्याच जाहिर केलेल्या उज्वला योजनेतंर्गत गरिब लाभार्थ्यांना गॅस सिलीडरची सबसिडी देणा-या या योजनेत अनेक श्रीमंतासंह चक्क चिखलीचे आ. राहूल बाेंंद्रे यांच्या नावाचा समावेश असल्याने शंभर टक्के बोगस झालेल्या या व दारिद्रय रेषेच्या प्रकाशित झालेल्या यादीचा जाहिर निषेध व्यक्त करण्यासाठी काँगे्रस पक्षाच्या श्शेकडो महिला कार्यकर्त्या व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर आ. बोंद्रे यांच्या नेतृत्वात यादया जाळून आंदोलन केले. व शासनप्रती आपला असलेल्या तीव्र रोष तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासमोर व्यक्त केला.आंदोलनाला संबोधित करतांना आमदार राहुल बोंद्रे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान हे नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष केद्रित करण्याऐवजी परदेश वा-या करण्यात गुंत आहेत तर राज्याच्या मुख्यमंत्रयाना प्रशासनीक अनुभव नसल्यानेच उज्वला योजनेत माइयासारख्या आमदार असलेल्या व्यक्तीचे समाविष्ठ होते. यावरून चिखली ती जर अशी परिस्थिती असेल तर जिल्यात व राज्यासह देशभरात यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार असेल हे यावरून लक्षात येते. भाजप सरकार हे केवळ घोषणा बाजीचे व जाहिरात बाजीचेच सरकार असल्याचे लक्षात येते. उज्वला योजनेमध्ये गरजू लाभार्थ्यांना गॅस सबसिडी मिळणे क्रमप्राप्त असतांना या योजनेत आर.एस.एसच्या अनेक धनदांडग्यांच्या नावांचा समावेश करूनच हे सरकार थांबले नाही तर केंद्र शासनाच्या पावलावर पाउल ठेवत राज्य शासनाने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या दारिद्रय रेषेच्या यादीत देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही योजनेत हजारो कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत याप्रकरणी दोषी असणा-यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे यावेळी आ.बोंदे्र यांनी सांगितले.
यावेळी चिखली काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, अॅड वृषालीताई बाेंंद्रे, जि. प.सदस्य अशोकराव पडघान, बाजार समिती सभापती विष्णू पाटील, यु. काँ. ता. अध्यक्ष रमेश सुरडकर, सचिन शिंगणे, कुणाल बोंद्रे, विजय गाडेकर, विजय शेजोळ, सौ. संगिताताई गाडेकर, अॅड विलास नन्हई, दयानंद खरात, विद्याताई देशमाने, ताहेर भाई, श्रीकृष्ण इंगळे, किशोर कदम, बिदुसिंग इंगळे, साहेबराव पाटील, उषाताई डुकरे, बंडु खरात, दिपक खरात, राणासुनिलकुमार सुरडकर, आसीफ भाई, डॉ. इसरार. राजु रज्जाक, सुनिताताई शिंगणे, करूणाताई बोंद्रे, प्रमिलाताई जाधव, श्शालीनीताई वानखेडे, सुनिताताई पवार, भारत पवार, किरण वानखेडे, सागर जाधव,तुषार बोंद्रे, भास्कर काकडे, भास्कर चांदोरे गोकुळ शिंगणे यांच्यासह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोठया संख्येने महिला व नागरिकांची उपस्थिती होती.