Breaking News

शिक्षक कॉलनीमध्ये दिवसा घरफोडी; 67 हजाराचा ऐवज घेवून चोरटे फरार

बुलडाणा, दि. 01 - भरदिवसा घराचा कडीकोंडा तोडून 67 हजार 600 रुपयांच मुद्देमाल घेवून चोरट्यांनी पळ काढला ही घटना स्थानिक शिवसाई कॉन्व्हेंट जवळ, शिक्षक कॉलनी येथे आज दि. 30 जून रोजी दुपारी घडली.
बुलडाणा अर्बनमध्ये प्रशासकीय अधिकारी असणार्‍या नम्रता पाटील या शिक्षक कॉलनी येथे राहतात. सकाळी 10 च्या दरम्यान त्या घरातून बाहेर पडल्या तसेच मुलगा शाळेत गेला असल्यामुळे घराला कुलूप लावले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील नगद 20 हजार रुपये अधिक सोन्याच्या दागीन्यासह 67 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल घेवून पळ काढला. दुपारी ही घटना उघडकीस आली. या बाबत बुलडाणा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुध्द 454, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी एका नागरीकाच्या खिशातून पैसे चोरुन चोरट्यांनी पळ काढला होता. त्यानंतर लगेच ही दुसरी घटना स
मोर आली आहे.