अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीचे काम दिशादर्शक : उके
सातारा, दि. 10 - स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीत उच्चतम प्रतीचे सूत उत्पादन सुरु आहे. सूत गिरणी उद्योगापुढे अनेक अडचणी असतानाही या गिरणीचे मार्गदर्शक संचालक आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कल्पकतेमुळे सूत गिरणीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सूत निर्यात करुन नावलौकिक प्राप्त केला आहे. गिरणीचे काम आदर्शवत असून ते इतर संस्थांंसाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र शासनाचे वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव उज्वल उके यांनी काढले.
सातारा तालुक्यातील वळसे येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीला उके यांनी सदिच्छा भेट देवून दिली. यावेळी गिरणीचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन रामचंद्र जगताप, व्हा. चेअरमन हणमंत देवरे उपस्थित होते.
सूत गिरणी उद्योगातील अडचणींबाबत माहिती देताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गेल्या 2-3 वर्षापासून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सततच्या मंदीमुळे वस्त्रोद्योग अत्यंत अडचणीत आला आहे. सूताचे दर त्या तुलनेत कमी आहेत. बाजारामध्ये सीसीआयकडे कापूस साठा नाही. खाजगी व्यापार्यांनी नफेखोरी करण्यासाठी साठेबाजी केल्यामुळे कृत्रीम तुटवडा भासवून कापसाचे भाव वाढविले आहेत. या परिस्थीतीमुळे उद्योगातील मानकानुसार उत्पादन क्षमता आणि उत्पादन काढले तरी सुध्दा कच्च्या मालाची किंमत 75 टक्के व प्रचंड वीज खर्च 18 टक्के यामुळे सूत गिरणी आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत सूत गिरण्या बंद पडल्यास कामगार बेरोजगार होतील, अशी परिस्थिती आहे.
सूत गिरण्यांचे प्रलंबीत प्रश्न तातडीने लक्ष घालून सूत गिरणी उद्योगाच्या स्थैर्यासाठी व सक्षमतेसाठी दुरगामी धोरण व पर्याय वरीष्ठ पातळीवर निश्चित करणार असल्याचे आश्वासन उके यांनी दिले. गिरणीचे चीफअकौंटंट मानसिंग पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सोलापूर प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक किरण सोनवणे, गिरणीचे संचालक जगन्नाथ किर्दत, बळीराम देशमुख, भरत कदम, सुरेश टिळेकर, भगवान शेडगे, विष्णू सावंत, गणपतराव मोहिते, उत्तमराव नावडकर, गिरणीचे प्रॉडक्शन मॅनेजर उदय औंधकर, मिल इंजिनीयर प्रदीप राणे, विनोद जाधव, राजेंद्र जाधव उपस्थित होते.