Breaking News

जतचे विभाजन करुन गैरसोय दूर करा ः आ. विलासराव जगताप

सांगली, दि. 29 -  जत तालुका कायम दुष्काळी असून, सांगली जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने सर्वात मोठा तालुका आहे. शासनाने या तालुक्याचे विभाजन रुन जनतेची होणारी गैरसोय कमी करावी, अशी मागणी आ. विलासराव जगताप यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन केली.तालुक्याची लोकसंख्या 3 लाख 29 हजार इतकी असून, 123 गावे व आठ महसूल मंडल आहेत. 2 हजार 245 चौ. कि. मी. इतके क्षेत्रफळ आहे. मागील वीस वर्षांपासून तालुका विभाजनाची मागणी प्रलंबित आहे. विभाजनाचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच दिला आहे. परंतु आजपर्यंत विभाजन करण्यात आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. जत तालुक्याचे विभाजन डावलून सांगली जिल्ह्यातील कडेगाव 55 गावे व पलूस 35 गावे हे नवीन तालुके शासकीय निकष डावलून झाले आहेत. तत्कालीन आघाडी शासनाच्या कालावधीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे जत तालुक्यातील जनतेवर अन्याय झाला आहे, असा आरोप आ. विलासराव जगताप यांनी विधानसभेत केला.