तेलगूची दुसर्या तर बुल्सचे विजयासह आव्हान जिंवत
कोलकाता, दि. 20 - अटीतटीच्या लढतीत रोहित कुमारच्या सुपर चढाईमुळे शेवटीच्या लढतीत प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील घरच्या मैदानावरील शेवटपर्यंत आघाडीवर असूनही बंगाल वॉरियर्सला पराभवाचा सामना करावा लागला. रोहित कुमारने एका चढाईत तीन खेळाडू बाद करून बंगळरू बुल्सला 27-25 असा विजय मिळवून दिला. बंगालचा बचाव संपूर्ण सामन्यात चांगला खेळताना दिसला परंतु शेवटीच्या मिनिटात त्यांना रोहितची पकड करता आली नाही. आणि सामन्यासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. चढाईत बंगालकडून जान कुन ली पुन्हा चमकदार कामगिरी बजावली.
मंगळवारी झालेल्या पहिल्या लढतील राहुलच्या सुपर टेनमुळे पुन्हा टायटन्स विजयी झाली असून दुसर्या क्रमांकवर झेप झेतली आहे. प्रभावी आक्रमणास राहुल चौधरीने तीन यशस्वी रिव्ह्यूची जोड देत तेलुगू टायटन्सला प्रो कबड्डीत दबंग दिल्लीविरुद्ध 36-28 असा विजय मिळवून दिला.
नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त स्टेडियमवरील सांगतादिनी दिल्लीला बाद फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यकच होता; पण राहुल चौधरीने डोक्याला लागल्यानंतरही पट्टी बांधून खेळताना आक्रमणाच्या चौदा गुणांना एका सुपर टॅकलची (पकड) जोडही दिली. दिल्लीच्या प्रतिआक्रमणातील हवा संदीप नरवालच्या प्रभावी पकडींनी काढली. त्याने दिल्लीचा कर्णधार मेराज शेख हा उडी मारून पकडीतून सुटत असतानाच त्याला उचलून घेतले आणि त्यानंतर दिल्लीचे आक्रमणच थंडावले.
सामन्याच्या सुरवातीस अतिउत्साहात रिव्ह्यू (पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद) घेतले, तर अंतिम टप्प्यात रिव्ह्यू राहत नाहीत. प्रतिस्पर्धी यामुळे निश्चिंत राहतात. खेळाच्या नियमाचा योग्य अभ्यास असल्याचे दाखवत राहुलने सर्वच संघांना जणू रिव्ह्यूचा योग्य उपयोग कसा करता येतो, हे दाखवले. त्याने या रिव्ह्यूत संघाविरुद्धचे एकंदर सहा गुण वाचवले. सामन्यातील गुणफरक आठ गुणाचा आहे, त्यामुळे राहुलने वाचवलेले गुण जास्तच मोलाचे ठरतात.