कोपर्डी बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
पुणे, दि. 20 - कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची विशेष महिला अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे. रश्मी शुक्ला या लवकरच कोपर्डीला जाऊन चौकशी करणार आहे. कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घून खून करण्यात आला. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. सरकारने घटनेची ताडीने दखल न घेतल्याने विधान सभेत या प्रकरणी सर्व विरोधी पक्षांकडून सरकारवर अनेक ताशेरे ओढण्यात आले.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यां
ची विशेष महिला अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे आज जाहीर केले. तसेच या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार असून दोषींना फाशीच व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल. हे प्रकरण विशेष जलदगती न्यायालयात चालवले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.