Breaking News

डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदारी जाहीर

क्लेव्हलँड, दि. 20 - डोनाल्ड ट्रम्प यांना 16 उमेदवारांमध्ये सर्वाधिक 1237 मताधिक्य मिळवून उमेदवारांच्या निवडणुकीत विजय मिळवला अमेरिकेच्या  अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
क्लेव्हलँड येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ट्रम्प यांचे नाव जाहीर करण्यात आले. यावेळी ट्रम्प यांनी माझ्यासाठी हे खूप सन्मानजनक असल्याचे म्हटले  आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून ट्रम्प यांची नवी आणि वेगळी प्रतिमा समोर येईल, असा विश्‍वास ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रमुख पॉल मॅनफोर्ट यांनी व्यक्त  केला आहे.