Breaking News

महापौर व उपमहापौर आज घेणार पदभार

 अहमदनगर (प्रतिनिधी)। 07 - शिवसेना व भारतीय जनता पार्टी युतीच्या नेते आणि पदाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन महापौर सौ. सुरेखा कदम व उपमहापौर श्रीपाद छिंदम हे गुरुवारी (दि. 7) सकाळी 11 वा. पदभार घेणार आहेत.
याप्रसंगी राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, सेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी, सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अँड़ अभय आगरकर, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, दत्तात्रय कावरे, सुवेंद्र गांधी, अनिल शिंदे, सचिन जाधव, दिलीप सातपुते, गौतम दिक्षीत, किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, सचिन पारखी यांच्यासह शिवसेना व भाजपच्या आजी आणि माजी नगरसेवक याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. पदभार स्विकारताना महानगरपालिकेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.