Breaking News

‘हेल्मेट सक्ती’ डोकं नसलेल्या सरकारचा निर्णय : अशोक चव्हाण

नाशिक, दि. 31 - हेल्मेटची सक्ती, डाळींचे वाढते भाव किंवा अडतबंदीचा निर्णय अशा कोणत्याही प्रश्‍नावर काय निर्णय घ्यावा हेच राज्याच्या मंत्र्यांना कळत नाही असा आरोप करत हेल्मेट सक्तीचा निर्णय हा डोकं नसलेल्या सरकारने घेतलेला निर्णय आहे, अशा शब्दात काँगˆेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सत्ताधारी युती सरकारवर सणसणीत टीका केली. तसेच ’ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ ही नरेंद्र मोदींची घोषणा फक्त डाळीपुरती खरी ठरली, असा शाब्दिक चिमटाही चव्हाण यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी घेतला. राज्यात येणार्‍या महापालिका आणि स्वराज संस्थाच्या निवडणुकांची तयारी काँगˆेसने सुरू केल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.