Breaking News

राज्यात महाराजस्व अभियान राबविले जाणार

औरंगाबाद, दि. 31 - राज्यात 1 ऑॅगस्ट 2016 ते 31 जुलै 2017 या कालावधीत (2016-17) महाराजस्व अभियान राबविले जाणार असून 1 ते 7 ऑॅगस्ट 2016 दरम्यान ‘महसूल आठवडा’ सुध्दा राबविण्यात येणार आहे.
या महसूल आठवड्यात महिला खातेदारांसाठी गाव पातळीवर मेळावे घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात महिला खातेदारांच्या अडी-अडचणी सोडविणे
, त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (महसूल) प्रल्हाद कचरे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे. शासनाच्या कृषी, सहकार, महिला आणि बालकल्याण या विभागांमार्फत शेतकर्‍यांसाठी, विशेषत्वाने महिलांसाठी राबविल्या जाणार्‍या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच महिला खातेदारांच्या महसूल विभागाशी संबंधित असणार्‍या अडी-अडचणी समजून घेण्यात येणार असून त्याच मेळाव्यात त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.