पुणे जिल्ह्यांतील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
पुणे, दि. 03 - गेल्या दोन दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊसाची हजेर लागल्यामुळे धरण्याच्या पाणी साठ्यात चांगल्या प्रमाणात वाढ होते आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एक जुलैपासून पावसाची जोर वाढला आहे. शनिवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, खडकवासला धरण क्षेत्रात सुमारे एक टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. नक्की किती पाणी साठले असे विचारत असाल तर पुणे शहराला किमान 20 दिवस पुरेल एवढे जमा झाले आहे.
रविवारी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे तीन तासांत खडकवसाला येथे 53 मिलिमिटर पाऊस पडला आहे. जून महिन्यात एकूण 36 मिलिमिटर पाऊस पडला होता. पानशेत 40, वरसगाव 46, टेमघर 58 मिलिमिटर पाऊस पडला आहे. पानशेत धरणात मंगळवारी 28 जून 1993 दशलक्ष घनफुट पाणीसाठा होता. तो आज सकाळी सहा वाजता 2001 (दशलक्ष घनफुट) झाला आहे. म्हणजे आठ फुटाने धरणाची पातळी वाढली. तर वरसगाव धरणात काल सकाळी 601.98 मीटर पाण्याची पातळी होती. आज सकाळी ती 605.30 मीटर झाली आहे. म्हणजे साडेतीन मीटरने पाण्याची पातळी वाढली आहे.
चारही धरणात एक जुलैला 1.47 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. आज रविवारी सकाळी तो 2.21 टीएमसी पाणीसाठा झाला. म्हणजे 0.74टीएमसी (740 दशलक्ष घनुफूट) पाणीसाठा वाढला. शहराला दोन दिवसात 40 दशलक्ष घनुफूट पाणी सोडले. म्हणजे 780 दशलक्ष घनुफूट पाणी जमा झाले आहे. पाणी कपात नसताना शहराला दिवसाला 40 दशलक्ष घनुफूट पाण्याची आवश्यकता असते. त्यानुसार, 780 दशलक्ष घनुफूट पाणी सुमारे शहराला किमान 20 दिवस पुरेल एवढे पाणी वाढले आहे. तर मागील 24 तासात आज एका दिवसात 170 दशलक्ष घनुफूट पाणीसाठा वाढला.
जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. परंतू जुलै महिना सुरु झालेल्या दोन दिवसात 20 दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे. 24 जूनपासून मॉन्सूनचा पाऊस अधिक सक्रीय झाला. यामध्ये सोमवार 27 व गुरुवार दि.30 जून रोजी किरकोळ पाऊस पडला. उरलेल्या सात दिवस चांगला पाऊस वाढला.