एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी शशिकला वंजारी यांची नियुक्ती
मुंबई, दि. 02 - स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शशिकला वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती चे विद्यासागर राव यांनी शनिवारी ही घोषणा केली.
डॉ. शशिकला वंजारी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभाग येथे विभागप्रमुख व प्राध्यापिका आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. वसुधा कामत यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय देशमुख कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. डॉ. शशिकला वंजारी यांनी रा.तु.म. नागपूर विद्यापीठातून जीवरसायन शास्त्र विषयात एम.एससी., तसेच इंग्रजी व शिक्षणशास्त्र विषयात पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या असून शिक्षण विषयात पी.एचडी. देखील प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, प्रशासन तसेच संशोधनाचा व्यापक अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत.