रेल्वे भरती 2 लाखाची फसवणूक
सांगली, दि. 29 - रेल्वे पोलिसात भरती करण्याच्या आमिषाने दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अजय प्रभाकर माने (रा. बामणी, ता. कानापूर) या भामट्याविरुदध विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
विटा येथील संपतराव यशवंतराव शितोळे हे गवंडी काम करतात. त्यांची बामणी येथील अजय माने याच्याशी आळख होती. शितोळे यांनी नातू केतन माने यास नोकरी नसल्याचे अजय माने यास सांगितले होते. त्यामुळे माने याने माझी रेल्वे पोलिसात ओळख असून, तुमचा नातू केतन माने (रा. आष्टा, ता. वाळवा) यास रेल्वे पोलिसात नोकरी लावतो, त्यासाठी पैसे भरावे लागतात, असे केतन याचे आयोबा संपतराव शितोळे यांना सांगितले.
त्यावेळी शितोळे यांनी पैसे देण्याचे कबूल केले. त्यामुळे अजय माने याने विटा बसस्थानक व आष्टा येथून 9 ऑगस्ट 2015 ते 2 फेब्रुवारी 2016 या कालावधीत वारंवार तीन टप्प्यात दोन लाख रुपये घेतले. परंतु, नोकरी लागत नसल्याचे पाहून केतनचे आजोबा शितोळे यांनी अजय माने या भामट्याकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीचे उत्तर देत आठ दिवसांनी पैस देतो, असे सांगितले. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून अजय माने याने शितोळे यांचा फोन घ्यायचेच बंद केले. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने संपतराव शितोळे यांनी विटा पोलिसांत अजय माने याच्याविरुद्ध फिर्याद दिली. उपनिरिक्षक एम. बी. सावंत तपास करीत आहेत.