Breaking News

बलात्कार करून 10 वर्षाच्या मूलीचा खून

हैदराबाद, दि. 03 - एका दहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि नंतर तिचा क्रूर पद्धतीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
शनिवारी दुपारी हैदराबाद शहरातील एका ताडीच्या दुकानात पीडित मुलीचे वडिल ताडी खरेदी करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही होती. दरम्यान शेजारीच एका इमारतीच्या बांधकामावर सेंटरिंगचे काम करत असलेल्या एका कामगाराने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखूवन पळवून नेले, अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना पोलिसांनी दिली. ताडी घेतल्यानंतर मुलगी हरविल्याचे तिच्या वडिलांना कळले. त्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. रविवारी सकाळी स्थानिकांना एका निर्जन स्थळी तिचा मृतदेह आढळून आला. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलगी ही शहरातील एका शाळेत तिसर्‍या वर्गात शिकत होती.