Breaking News

ओवेसी यांना तुरुंगात पाठवा : जदयू

पाटना, दि. 03 - एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे सर्वात मोठे देशविरोधक असून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांना तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणी संयुक्त जनता दलाने केली आहे. हैदराबाद येथे राष्ट्रीय तपास संस्थेने टाकलेल्या छाप्यात इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून भारतातून अटक करण्यात आली आहे. या युवकांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी एमआयएम मदत करणार असल्याचे ओवेसी यांनी जाहीर केले आहे. त्यावरून त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेशी बोलताना संयुक्त जनता दलाचे नेते अजय आलोक म्हणाले, ओवेसी हे सर्वांत मोठे देशविरोधक आहेत. आयसीसशी संबंधित लोकांना ते कायदेशीर मदत देत आहेत. अशा लोकांना तुरुंगात पाठवायला हवे आ
णि त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करायला हवे.