Breaking News

जीप दरीत कोसळून 10 ठार

डेहराडून, दि. 3 - उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्री जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातात 10 जण ठार झाले. मुसळधार पावसामुळे ही जीप दरीत कोसळली. उत्तराखंडमध्ये पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये मरण पावणा-यांचा आकडा आता 25 पर्यंत पोहोचला आहे. डोंगराळ प्रदेश असलेल्या उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे विविध ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्ते वाहतूक बंद झाली आहे. जीप चालक उखडलेल्या रस्त्यावरुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले व जीप 500 फूट खोल दरीत कोसळली. रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.